Tuesday 3 February 2015

मुंबई : आपल्या सभोवताली अशा काही गोष्टी घडत असतात, त्या का घडतात त्या मागचे कारण काय हे आपण जाणून घेत नाही. पण त्यांच्या मागची कारणं आता आम्ही सांगणार आहोत. आज जाणून घ्या उचकी का लागते...
ही एक संरक्षित प्रतिक्षित क्रिया आहे. जठरात आम्लाचे प्रमाण वाढले की विषकारक पदार्थ तयार झाले किंवा काही असाधारण परिस्थिती निर्माण जाली की जठराबरोबर स्नायुयुक्त पडदाही अचानक आकुंचन पावतो, त्यामुले हवा फुफ्फुसात जाऊन/जाण्यातस अविरोध निर्माण होतो. आणि एक विशिष्ट आवाज निर्माण होतो याला उचकी लागली असे म्हणतात. 
डायफ्रॅमच्या आकुंचनामुळे फुफ्फुसातील हवा श्‍वासनलिकेतून बाहेर टाकली जाण्याची क्रिया होते, परंतु स्वरयंत्रणेतील पट्ट्या जवळ असल्यामुळे मोठ्याने आवाज होतो. प्रत्यक्ष उचकी लागत असताना श्‍वास बाहेर पडत असतो. या वेळात श्‍वास आत घेता येत नाही, त्यामुळे व्यक्तीला अस्वस्थपणा जाणवतो. उचकी अर्थातच काही सेकंदसुद्धा रिक्त नसते. त्यामुळे श्‍वास बंद पडण्याची भीती नसते. तरीही उचकी लागणे व श्‍वासावरोध होणे याची मनात सांगड घातली जाते. ही भीती बहुतेक वेळा अनाठायीच असते.
उचकी थांबवण्यासाठी काय कराल ?
१) पाणी पिताना जर उचकी लागली असेल तेव्हा शक्य असेल तर डोके जमिनीच्या बाजूला वाकवून पाण्याचे घोट घ्या.
२) श्वास नाकातोंडाने अडवून ३० पर्यंत आकडे म्हणा. त्यावेळची उचकी गिळून टाका.
३) साखर खा.
४) लहान मुलांना मध चाटवण्यास देतात.

No comments:

Post a Comment