Thursday 22 January 2015

NASA and Microsoft have teamed up to develop software called OnSight,

NASA and Microsoft have teamed up to develop software called OnSight, a new technology that will enable scientists to work virtually on Mars using wearable technology called Microsoft HoloLens.
Developed by NASA’s Jet Propulsion Laboratory (JPL) in Pasadena, California, OnSight will give scientists a means to plan and, along with the Mars Curiosity rover, conduct science operations on the Red Planet.
“OnSight gives our rover scientists the ability to walk around and explore Mars right from their offices,” said Dave Lavery, program executive for the Mars Science Laboratory mission at NASA Headquarters in Washington. “It fundamentally changes our perception of Mars, and how we understand the Mars environment surrounding the rover.”
OnSight will use real rover data and extend the Curiosity mission’s existing planning tools by creating a 3-D simulation of the Martian environment where scientists around the world can meet. Program scientists will be able to examine the rover’s worksite from a first-person perspective, plan new activities and preview the results of their work firsthand.
“We believe OnSight will enhance the ways in which we explore Mars and share that journey of exploration with the world,” said Jeff Norris, JPL’s OnSight project manager.
Until now, rover operations required scientists to examine Mars imagery on a computer screen, and make inferences about what they are seeing. But images, even 3-D stereo views, lack a natural sense of depth that human vision employs to understand spatial relationships.
The OnSight system uses holographic computing to overlay visual information and rover data into the user's field of view. Holographic computing blends a view of the physical world with computer-generated imagery to create a hybrid of real and virtual.
To view this holographic realm, members of the Curiosity mission team don a Microsoft HoloLens device, which surrounds them with images from the rover's Martian field site. They then can stroll around the rocky surface or crouch down to examine rocky outcrops from different angles. The tool provides access to scientists and engineers looking to interact with Mars in a more natural, human way.
"Previously, our Mars explorers have been stuck on one side of a computer screen. This tool gives them the ability to explore the rover's surroundings much as an Earth geologist would do field work here on our planet," said Norris.
The OnSight tool also will be useful for planning rover operations. For example, scientists can program activities for many of the rover's science instruments by looking at a target and using gestures to select menu commands.
The joint effort to develop OnSight with Microsoft grew from an ongoing partnership to investigate advances in human-robot interaction.  The JPL team responsible for OnSight specializes in systems to control robots and spacecraft. The tool will assist researchers in better understanding the environment and workspace of robotic spacecraft -- something that can be quite challenging with their traditional suite of tools.
JPL plans to begin testing OnSight in Curiosity mission operations later this year. Future applications may include Mars 2020 rover mission operations, and other applications in support of NASA's journey to Mars.
JPL manages the Mars Science Laboratory Project for NASA's Science Mission Directorate in Washington, and built the project's Curiosity rover.
Learn more about NASA’s journey to Mars at:

Tuesday 20 January 2015

कार्बनचे जागतिक उत्सर्जन कमी क

पेरूमध्ये जागतिक परिषदेस प्रारंभ 

वृत्तसंस्था, लिमा 

कार्बनचे जागतिक उत्सर्जन कमी करण्याकरिता नवा महत्त्वाकांक्षी आणि बंधनकारक करार करण्यासंदर्भात चर्चा करण्यासाठी भारतासह जगभरातील १९०हून अधिक देशांच्या प्रतिनिधींची मांदियाळी सोमवारपासून दक्षिण अमेरिकेतील पेरू देशाची राजधानी लिमा येथे जमली आहे. पुढील वर्षी डिसेंबरमध्ये पॅरिसमध्ये होणाऱ्या परिषदेत याबाबतच्या ऐतिहासिक कराराला अंतिम रूप देण्यासाठी यंदाची परिषद ही शेवटची संधी आहे. १२ दिवसांच्या या परिषदेत केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांच्या नेतृत्वाखालील १७ सदस्यांचे शिष्टमंडळ सहभागी झाले आहे. 

सहभागी देशांनी हवामानबदलाच्या अनुषंगाने स्वतःहून करायच्या ठरवलेल्या गोष्टी २०१५च्या कराराकरिता सांगायच्या आहेत. विकसनशील देशांकडे प्रत्येक क्षेत्रनिहाय उत्सर्जनघट करण्याचा, तसेच ऊर्जेची तीव्रता वाढवण्यासंदर्भातील उद्दिष्टांचा पर्याय आहे. पॅरिस परिषदेत त्या करारावर स्वाक्षऱ्या केल्या जाणार आहेत. त्या कराराची अंमलबजावणी २०२०पासून होणार आहे. 

परिषद कशासाठी? 

युनायटेड नेशन्स फ्रेमवर्क कन्व्हेंन्शन ऑन क्लायमेट चेंज (यूएनएफसीसीसी) या संयुक्त राष्ट्रांच्या संस्थेच्या सभासद देशांची दरवर्षी होणारी ही परिषद आहे. ही संस्था १९९४मध्ये अस्तित्वात आली. या परिषदेला कॉन्फरन्स ऑफ पार्टीज (सीओपी) असे म्हणतात. हवामानबदलाशी लढण्याकरिता कृती आराखडा तयार करण्यासाठी आणि त्याबाबत जागतिक बंधनकारक करार करण्यासाठी ही परिषद भरवली जाते. जपानमध्ये क्योटो इथे १९९७मध्ये झालेल्या परिषदेत केलेला क्योटो प्रोटोकॉल २००५मध्ये अंमलात आला. त्याद्वारे ३७ विकसित देशांना पहिल्या टप्प्यात २०१२ पर्यंत त्यांचे कार्बन उत्सर्जन घटवण्याचे बंधन घालण्यात आले. पुढील टप्प्याची मुदत २०२०पर्यंत आहे. मात्र क्योटो प्रोटोकॉल फारसा यशस्वी ठरला नाही. उत्सर्जनात कपात करण्याची जबाबदारी सर्व देशांची असल्याचे २०१०च्या कॅनकून येथील परिषदेत ठरले. 

भारतासाठी काय? 

गेल्या काही वर्षांत भारत विकासाकडे वेगाने वाटचाल करू लागल्यावर कार्बन उत्सर्जन वाढले आहे. त्यामुळे भारताच्या म्हणण्याला या परिषदेत महत्त्व आहे. चीन, अमेरिका, युरोपीय महासंघ यांच्यानंतर उत्सर्जनात भारताचा चौथा क्रमांक लागतो. त्यामुळे भारतावरही उत्सर्जन घटवण्यासाठी दबाव येण्याची शक्यता; मात्र भारताची उत्सर्जनवाढ गेल्या दहा वर्षांतच झाल्याने आजच्या तापमानवाढीसाठी भारत जबाबदार नसल्याची भारताची भूमिका. गरीब देशांना विकासासाठी पुरेशी संधी दिली पाहिजे, असे भारताचे मत. सौर ऊर्जेची क्षमता पाच पटींनी वाढवून २०३०पर्यंत १०० गिगावॅटपर्यंत नेण्याचे भारताचे नियोजन. 



चार महत्त्वाचे घटक 

२००७ मध्ये बाली येथे झालेल्या परिषदेत हवामानाच्या करारासाठी चार महत्त्वाचे घटक ठरवण्यात आले. 

उत्सर्जनात कपात: ठरवलेल्या मुदतीत हरितगृह वायूंच्या उत्सर्जनात ठरवलेल्या उद्दिष्टांएवढी कपात करणे बंधनकारक 

परिस्थितीशी जुळवून घेणे: हवामानबदलाच्या परिणामांशी जुळवून घेण्यासाठी सहभागी देशांना मदत करण्याकरिता कृती आराखडा 

तंत्रज्ञान हस्तांतर : हवामानबदलावर नियंत्रण आणण्यासाठी किंवा जुळवून घेण्यासाठी योग्य तंत्रज्ञानाची उपलब्धता करून देण्यासाठी आराखडा 

अर्थसाह्य : गरीब देशांना हवामानबदलाशी दोन हात करण्याकरिता अर्थसाह्य. 

आयपीसीसीचा अहवाल 

विविध भागांमध्ये हवामानबदल होत असल्याने उष्णतेची लाट, दुष्काळ, पूर, चक्रीवादळ आणि वणवे आदी आपत्ती उद्‍भवत आहेत. या शतकाच्या अखेरीस या संकटांचा धोका वाढतच जाणार आहे. 

असा धोका भारतासह जगभरातील २० देशांना 

घनदाट लोकवस्तीच्या मुंबई आणि कोलकाता या भारताच्या किनारी शहरांना हवामानबदलाचा सर्वाधिक फटका बसण्याची शक्यता. 

चालू शतकाच्या शेवटी पुरामुळे मोठ्या प्रमाणात जीवित व वित्तहानी होण्याची भीती या शहरांना अधिक

हसा लेको

अपेक्षांची परिसीमा कशाला म्हणावं? 

नवऱ्याने बायकोला तिळगूळ देणं आणि म्हणणं 'तिळगूळ घे आणि गोड गोड बोल.' 

- ढग्गोबाई

=======================================================
संक्रांत स्पेशल 

नवी पुणेरी पाटी 

तिळगूळ जर व्हॉटसअॅपवरुन देण्यात येणार असतील तर गोड बोलणंसुद्धा फक्त व्हॉटसअॅपवरच होईल याची कृपया नोंद घ्यावी. 

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
संक्रांत स्पेशल 

संक्रांतीच्या निमित्ताने पुण्यातल्या एका पतंगवाल्याने दुकानात बोर्ड लावला होता. 

नवऱ्यांनो, तुमच्या बायकोचा फोटो पतंगावर लावा आणि पतंग हवेत उडवा. 

...आणि बायको गेली उडतचा आनंद लुटा. 

######################################################################
घरातला फोन खणाणला. 

फोनवरचा आवाज - हॅलो, पूजा आहे का? 

गोखले काका - नाहीय. 

फोनवरचा आवाज - मग करून घ्या ना एकदा. 
!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
ऑफिसमध्ये लिहिलेली एक पाटी. 

वर्ष बदललंय म्हणून हुरळून जाऊ नका. 

कॅलेंडर बदलणार आहे...बॉस नाही. 

... 

परिस्थिती ‌तीच असणार आहे. 


मूत्रपिंड विकाराचे प्रमाण गेल्या काही काळात वाढताना​ दिसते आहे.

मूत्रपिंड विकाराचे प्रमाण गेल्या काही काळात वाढताना​ दिसते आहे. त्याची कारणे समजावून घेतली तर त्यापासून बचाव करता येईल. अनेकदा मूत्रपिंड बदलण्याचीही वेळ येते. अशावेळी देणारा आणि घेणारा या दोघांनीही काळजी घेणे आवश्यक असते... 

मूत्रपिंड विकाराची कारणं आणि प्रकार खूप आहेत. पण मुख्य मुद्दा म्हणजे या सर्वांत लघवीचं प्रमाण कमी होतं. लघवीत प्रथिने उतरतात आणि रक्तातील निरनिराळ्या घटकांचं प्रमाण बदलतं. रक्तदाब वाढतो. शरीरात पाणी आणि क्षार साठल्याने सर्वत्र सूज येते. या सर्वांचा अर्थ असा, की मूत्रपिंडाचं कार्य धीमे होत जाते. भारतात या आजाराबद्दल आणि त्याच्या प्रतिबंधात्मक उपायाविषयी माहिती कमी आहे, मात्र, या अवस्थेतील मूत्रपिंडाच्या व्याधीविषयी माहिती होते.त्यामुळेच मूत्रपिंडाच्या प्रत्यारोपणाविषयीही शास्त्रीय माहिती असणे गरजेचे आहे. 

मूत्रपिंडविकाराच्या किती पायऱ्या असतात? 

सामान्य व किंचित वाढलेल्या गाळपासहितची मूत्रपिंडहानी l मूत्रपिंडकार्यात झालेली किंचित घट l मूत्रपिंडकार्यात झालेली मध्यम प्रमाणातील घट l गंभीर स्वरूपातील मूत्रपिंडकार्यात झालेली घट l मूत्रपिंड निकामी होणे 

प्रत्यारोपणासाठी आवश्यक घटक 

- परिचयातील किंवा अपरिचित दाता, मेंदू मृतावस्थेमधील कॅडेव्हेअर दाता 

- मूत्रपिंडे स्वीकारणाऱ्या व्यक्तींचा फिटनेस 

- ६५ पेक्षा कमी वयोमर्यादा 

- मधुमेह, हृदयविकार, मधुमेह, मुतखडा, अंधत्व यासारखे कोणतेही आजार नको 

दात्यासाठी नियमावली 

- ६५ पेक्षा कमी वय 

- मधुमेह नको 

- कावीळ, पाच वर्षापासून कर्करोगासारख्या आजाराची बाधा नको 

- एचआयव्ही तसेच कावीळ सारखा आजार नको 

वैद्यकीय पद्धती 

एकाचवेळी दोन शस्त्रक्रिया केल्या जातात, ज्यात दात्याची मूत्रपिंडे काढून मूत्रपिंडाची गरज असलेल्या पेशंटला बसवली जातात. 

शस्त्रक्रियेनंतरची काळजी 

- काही विशिष्ट काळासाठी औषधोपचार सुरू राहतात 

- रोगप्रतिकारशक्ती क्षीण असल्याने गर्दीच्या जागी जाऊ नये 

- संसर्गजन्य व्यक्तीच्या संपर्कात राहू नये 

- मास्कचा वापर करावा 

- डॅाक्टरी सल्ल्याने फॅालो अप 

- औषधे स्वतःहून बंद करू नयेत 

दात्यासाठी काळजी 

- विशेषत्वाने कोणतेही बंधन नाही 

- मात्र डॅाक्टरांचा फॅालो अप चुकवू नये