Christ Redeemer: Rio de Janeiro, Brazil
क्रिस्तो रेदेंतोर (पोर्तुगीज: Cristo Redentor) हा ब्राझिल देशाच्या रियो दि जानेरोमधील येशू ख्रिस्ताचा एक पुतळा आहे. ३९.६ मी उंच व ३० मी रूंद असलेला हा पुतळा येशू ख्रिस्ताचा जगातील पाचव्या क्रमांकाचा मोठा पुतळा आहे. हा पुतळा रियोजवळील कोर्कोव्हादो नावाच्या ७०० मी उंचीच्या डोंगराच्या माथ्यावर स्थित असून तो इ.स. १९२२ ते १९३१ ह्या काळादरम्यान बांधला गेला. क्रिस्तो रेदेंतोर रियो व ब्राझिलच्या सर्वात ठळक खुणांपैकी एक असून ब्राझिलमधील ख्रिस्ती धर्माचे प्रतिक मानला जातो.
२००७ साली प्रकाशित झालेल्या जगातील सात नव्या आश्चर्यांपैकी क्रिस्तो रेदेंतोर हे एक आहे.
======================================================================
Great Wall of China: China
चीनची भिंत चीन देशात अतिप्राचीन काळात उत्तरेकडील सीमेवरुन मंगोलिया प्रांतातून होणारी परकीय आक्रमणे थांबविण्यासाठी दगड, माती व विटा वापरुन बांधली गेली. ह्या महान भिंतीचे अनेक भाग असून त्यांची एकूण लांबी सुमारे ६,४०० किमी आहे.
चीनची भिंत आधुनिक जगातील सात आश्चर्यांपैकी एक आहे.
@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@
माक्सू पिक्त्सू (स्पॅनिश: Machu Picchu) हे पेरू ध्वज पेरू देशातील ऐतिहासिक इन्का साम्राज्यातील एक स्थळ आहे. माक्सू पिक्त्सू पेरूमधील कुस्को शहराच्या ८० किमी वायव्येला समुद्रसपाटीपासुन ८,००० फूट उंचीवर स्थित आहे व इन्का साम्राज्याच्या सर्वाधिक महत्वाच्या खुणांपैकी एक मानले जाते. युनेस्कोने माक्सू पिक्त्सूला जागतिक वारसा स्थान जाहीर केले आहे. तसेच २००७ साली प्रकाशित झालेल्या जगातील सात नवी आश्चर्ये ह्या यादीमध्ये देखील माक्सू पिक्त्सूचा समावेश केला गेला.
#################################################################################
Machu Picchu Peru
माक्सू पिक्त्सू (स्पॅनिश: Machu Picchu) हे पेरू ध्वज पेरू देशातील ऐतिहासिक इन्का साम्राज्यातील एक स्थळ आहे. माक्सू पिक्त्सू पेरूमधील कुस्को शहराच्या ८० किमी वायव्येला समुद्रसपाटीपासुन ८,००० फूट उंचीवर स्थित आहे व इन्का साम्राज्याच्या सर्वाधिक महत्वाच्या खुणांपैकी एक मानले जाते. युनेस्कोने माक्सू पिक्त्सूला जागतिक वारसा स्थान जाहीर केले आहे. तसेच २००७ साली प्रकाशित झालेल्या जगातील सात नवी आश्चर्ये ह्या यादीमध्ये देखील माक्सू पिक्त्सूचा समावेश केला गेला.
$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$
Petra: Jordan
पेट्रा (अरबी: البتراء, अल-बात्रा; ग्रीक: πέτρα; इंग्रजी: पेट्रा, पात्र) जॉर्डन च्या प्रांतात स्थित एक ऐतिहासिक शहर दगड इमारती कोरलेली पाणी वाहून नेणे प्रणाली प्रसिद्ध आहे कोण M'an आहे. सहाव्या शतकात इ.स.पू. Nbation राजधानी म्हणून स्थापन करण्यात आली. तो त्याच्या बांधकाम 1200 सुमारे सुरुवात केली, असे म्हटले जाते बीसी. [1] आधुनिक काळात, तो एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. डोंगराच्या उतारावर बांधले पेट्रा एक "होर" असे म्हटले जाते आणि एक नदी मध्ये स्थित पर्वत, वेढला आहे. डोंगरावर चालू "वादी आर्बा" ते मृत समुद्र एकाबा आखात (وادي عربة) खोऱ्यात पूर्वेला म्हटले जाते. जागतिक वारसा स्थिती कायदेतज्ज्ञ म्हणून पेट्रा आहे. बीबीसी त्याच्या "40 ठिकाणी संपणारा आधी" पेट्रा मध्ये समाविष्ट केले आहे.
!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
Pyramid at Chichén Itzá: Yucatan Peninsula, Mexico
चिचेन इत्सा (स्पॅनिश: Chichén Itzá) हे प्राचीन माया संस्कृतीमधील एक शहर होते. हे पुरातत्त्वशास्त्र स्थळ मेक्सिकोच्या युकातान राज्यामध्ये स्थित असून ते युनेस्कोचे जागतिक वारसा स्थान आहे. तसेच २००७ साली प्रकाशित झालेल्या जगातील सात नवी आश्चर्ये ह्या यादीत देखील चिचेन इत्साला स्थान मिळाले आहे.
&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&
Roman Colosseum: Rome, Italy
कलोसियम हे रोम शहरामधील अंडाकृती आकाराचे एक खुले थिएटर आहे. ऐतिहासिक रोमन साम्राज्य काळात बांधले गेलेले कलोसियम थिएटर रोमन वास्तूशास्त्र व अभियांत्रिकीचे एक सर्वश्रेष्ठ उदाहरण मानले जाते.
सम्राट व्हेस्पासियनच्या मार्गदर्शनाखाली इ.स. ७० ते ७२ काळामध्ये कलोसियमचे बांधकाम सुरु झाले[१] व इ.स. ८० साली टायटसच्या काळात ते पूर्ण झाले.५०,००० प्रेक्षकांची क्षमता असलेले कलोसियम कला, संगीत, नाटके, लढाया इत्यादी मनोरंजन प्रकारांसाठी वापरले जात असे.
२००० वर्षे जुने कलोसियम नैसर्गिक झीज, भूकंप इत्यादी घटनांमुळे काही अंशी नष्ट झाले असले तरी आजही ते रोममधील सर्वांत लोकप्रिय पर्यटनस्थळ आहे. २००७ साली प्रकाशित झालेल्या जगातील सात नव्या आश्चर्यांपैकी कलोसियम हे एक आहे
********************************************************************************
Taj Mahal: Agra, India
-
ताजमहाल हे भारतातील आग्रा शहरात यमुना नदीकाठी असलेले स्मारक असून हे जगातील सात आश्चर्यांपैकी एक गणले जाते. मुघल बादशाह शाहजहान याने त्याच्या मुमताज महल या प्रिय पत्नीच्या मृत्युपश्चात तिच्या स्मृत्यर्थ या संगमरवरी बांधकामाची निर्मिती करवली.
No comments:
Post a Comment