Saturday 6 December 2014

#मालिका#गीते #झी #मराठी Malika_Geete

मालिका गीते

अनुबंध Anubandh  
अभिलाषा Abhilasha 
  अवघाचि संसार Avaghachi Sansar  
 अवंतिका Avantika  
 असंभव Asambhav  
आभाळमाया Aabhalmaya  
आम्ही सारे खवैय्ये Aamhi Sare Khavaiyye  
 उंच माझा झोका Unch Majha Zoka 
 ऊन पाऊस Oon Paus



#झी #मराठी

मालिका:- अनुबंध

चालले होते सुखाने, वाहे उधाण वारे पाऊले नेती कुठे? 
हे रस्ते- अनोळखी सारे कोणता करार ज्याचे बंधन झाले...
 जीवघेणा हाच बंध... अनुबंध!

गीत -अश्विनी शेंडे
संगीत-स्वप्नील बांदोडकर
स्वर -बेला शेंडे ,  सुरेश वाडकर(शीर्षक गीत, मालिका- अनुबंध, वाहिनी- झी मराठी)

,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
मालिका :-अभिलाषा
   
आयुष्याचे हे चक्र चालते साद घालते आशा स्वप्‍नांमागून सत्य धावते ही दैवाची रेषा जन्मापासून कोण खेळवी तुलाच नाही ठावे हवेहवेची हाव सरेना किती हिंडशी गावे ऐक सुखाचा मार्ग मानसा सोड सोड अभिलाषा अभिलाषा..... अभिलाषा

गीत -सौमित्र
संगीत-अशोक पत्की
स्वर-आरती अंकलीकर-टीकेकर ( शीर्षक गीत, मालिका- अभिलाषा, वाहिनी- झी मराठी )

.......................................................................................................

गीत -रोहिणी निनावे 
संगीत-अशोक पत्की 
स्वर -देवकी पंडित( शीर्षक गीत, मालिका- अवघाचि संसार, वाहिनी- झी मराठी )

मन माझे मोरपिशी स्वप्‍न जणू मन माझे शिशिरातील इंद्रधनू हुंदक्यांची कुजबुज वेदनांचे अलगूज नवा छंद नवा ध्यास शोधी नवे आकाश राखेतून मीच नवा घेतला आकार उजळून जाई पुन्हा, अवघाचि हा संसार
==============================================

गीत -सौमित्र 
संगीत-नरेंद्र भिडे 
स्वर -विभावरी आपटे ( शीर्षक गीत, मालिका- अवंतिका, वाहिनी- झी मराठी )


सुख आणिक दु:ख यांना सांधते आहे जीवनाशी ती कधीची भांडते आहे दोन डोळ्यांनी मुक्याने बोलताना ती वेगळे काहीतरी बघ सांगते आहे जीवनाचे एक गाणे गात जाताना वेगळीशी चाल त्याची बांधते आहे जीवनासाठी जणू ही अकस्मिता सूख आणिक दु:ख वेडी अवंतिका  उगवले आहे इथे हे झाड पाण्याचे आसवांना तीच वेडी सांडते आहे जीवनासाठी जणू ही अकस्मिता सूख आणिक दु:ख वेडी अवंतिका
--------------------------------------------------------------------------------

गीत -गुरु ठाकूर ,मधुकर जोशी 
संगीत-स्वप्नील बांदोडकर
स्वर -स्वप्नील बांदोडकर ( शीर्षक गीत, मालिका- असंभव, वाहिनी- झी मराठी )


नैनं छिन्दन्ति शस्‍त्राणि नैनं दहति पावक: । न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुत: ॥  दिवसामागून रात्र धावते सकाळ-संध्याकाळ सूत्रधार जो या सार्‍याचा नाव तयाचे काळ काय तयाच्या मनात दडले नकळे कधी कुणा क्षणांत होते संभव सारे क्षणापूर्वीचे, असंभव!

/////////////////////////////////////////////////////////////////////////////////////////

गीत -मंगेश कुळकर्णी
संगीत-अशोक पत्की
स्वर -देवकी पंडित  ( शीर्षक गीत, मालिका- आभाळमाया, वाहिनी- झी मराठी )

जडतो तो जीव लागते ती आस बुडतो तो सूर्य उरे तो आभास कळे तोच अर्थ उडे तोच रंग ढळतो तो अश्रू सुटतो तो संग दाटते ती माया सरे तोच काळ ज्याला नाही ठाव ते तर आभाळ घननीळा डोह पोटी गूढ माया आभाळमाया...... आभाळमाया.......

............................................................................................................

गीत -मंगेश कुळकर्णी
संगीत-अशोक पत्की
स्वर -स्वप्नील बांदोडकर ( शीर्षक गीत, मालिका- आम्ही सारे खवैय्ये, वाहिनी- झी मराठी )

आम्ही म्हणजे, तुम्ही म्हणजे, तुम्ही-आम्ही सारे ज्यांना पोट आहे, तोंड आहे, जीभ आहे, सोस आहे चमचमीत खाण्याचं, ते- आम्ही सारे खवैय्ये!  एकमेकां शिकवीत, नवे काही बनवावे कितीकिती चोचले ते जिभेचे हे पुरवावे छान छान देशी-विदेशी पदार्थ जाणून घ्यावे चुकता-चुकता करता-करता खावे अन् खिलवावे आम्ही सारे खवैय्ये!

###################################################

 गीत - अरुण म्हात्रे
 संगीत - निलेश मोहरीर
 स्वर - जान्हवी प्रभू-अरोरा   ( शीर्षक गीत, मालिका- उंच माझा झोका, वाहिनी- झी मराठी )


चांदणचाहूल होती कोवळ्या पाऊली माप मी ओलांडले अन्‌ दूर गेली भातुकली खेळण्याचे होते वय, अंगणाची होती सय सोवळ्या मनात माझ्या भरे नभाचा आशय 

 थबकले उंबर्‍यात मी पाहुनी नवी पहाट जणू जन्मले नव्याने भरता हा मळवट हाती अमृताचा वसा, साथ देई माझा सखा त्याच्या कृतार्थ डोळ्यांत... झुले उंच माझा झोका!  

दाटुनिया येता मेघ भरे आकाश ओंजळ माळ ही व्रताची जपता झाले घराचे देऊळ झिजे पायरी होऊन जन्म चंदनासारखा त्याच्या कृतार्थ डोळ्यांत... झुले उंच माझा झोका!  

आरतीत तेवे माझ्या मंद ह्या व्रताची समई तुळशीचे रोप माझे उंच आभाळात जाई मीच ओलांडले मला, सोबतीस माझा सखा येई कवेत आकाश... झुले उंच माझा झोका!  

असे आगळे हे नाते ऐक ही रमा सांगते बीज हे रुजे अंतरी, जगण्याचे फूल होते अशा संसार गाण्याला त्याचा-माझा एक ठेका त्याच्या कृतार्थ डोळ्यांत... झुले उंच माझा झोका!
@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@


संगीत-नरेंद्र भिडे
स्वर -महालक्ष्मी अय्यर ( शीर्षक गीत, मालिका- ऊन पाऊस, वाहिनी- झी मराठी )

ऋतु सोबतीने सारी जुनी झाडे नवी होता पानेफुले सांगतात ऊन-पावसाची कथा  

सुख सोसावे उन्हाचे, दु:ख पावसाळी गावे अशा सोसण्याला द्यावी किती नवी-जुनी नावे अशा जगण्याची सय किती भावी होता होता ऊन पावसाची कथा, ऊन पावसाची कथा  

जसा वारा हेलावून सांगे वादळाची व्यथा ऊन पावसाची कथा, ऊन पावसाची कथा
******************************************************

No comments:

Post a Comment