Monday, 8 December 2014

वाहिनी - झी मराठी..... मालिका गीते

                                               वाहिनी - झी मराठी..... मालिका गीते





गीत - श्रीरंग गोडबोले
संगीत-अजय-अतूल
स्वर - सचिन पिळगावकर
  ( शीर्षक गीत, मालिका- एका पेक्षा एक, वाहिनी- झी मराठी )



       एका पेक्षा एक              

चमचमते तारे भिरभिरते वारे
आकाश सारे अंगावरी उतरे
हृदयाचा ठोका शरीराचा झोका
पायाचा ठेका मस्तीचे हे नखरे
नाचुया तालावरी, डोलुया बोलांवरी
लहरु या वार्‍यावरी – girls and boys lets swing and say
lux एका पेक्षा एक baby, let the body shake baby
एका पेक्षा एक baby, अशी ही dance मस्ती!
========================================================================


संगीत - मिलिंद जोशी
स्वर - मनिषा जोशी
  ( शीर्षक गीत, मालिका-अंकूर, वाहिनी- झी मराठी )

अंकूर

सखे ग सये गाऊया आता आनंदाची गाणी ग
आतल्या आत पिऊन टाकू डोळ्यांतले पाणी ग
पाण्यावर त्या एक नव्याचा फुटेल अंकूर ग
विसावयाला एक नव्याने मिळेल माहेर ग

माहेरी जाऊन एकदा फिरून लहान होऊया ग
धरून आईच्या बोटाला नवे पाऊल टाकूया ग
मायेच्या गावा मळभ सारे क्षणांत विरेल ग
मनातले जे येईल ओठी होईल सुरेल ग
तेजाची भाषा नवीन आशा डोळ्यांत हसेल ग
भल्याआडचे बुरेही तेव्हा सहज दिसेल ग

राजहंस तो सहज ओळखी मोत्यांमधले पाणी ग
फक्‍त विणकरा ऐकू येती धोट्यामधली गाणी ग
निशब्दाच्या कुशीत अलगद गूज नव्याचे रुजते ग
स्वागत करण्या त्याचे अन्‌ मग सृष्टी सारी सजते ग

तुला नि मला दावील दिशा एक स्वत:चा तारा ग
शोधून त्याला जिंकून घेऊ खेळ हा सारा ग
*******************************************************************************
गीत - अश्विनी शेंडे
संगीत -निलेश मोहरीर
स्वर - वैशाली सामंत
  ( शीर्षक गीत, मालिका- कळत नकळत, वाहिनी- झी मराठी )

 कळत नकळत

मन होई फुलांचे थवे गंध हे नवे कुठुनसे येती
मन पाऊल पाऊल स्वप्‍ने ओली हुळहुळणारी माती
मन वार्‍यावरती झुलते, असे उंच उंच का उडते
मग कोणा पाहून भुलते-
सारे कळत नकळतच घडते

कुणीतरी मग माझे होईल हात घेउनी हाती
मिठीत घेऊन मोजू चांदण्या काळोखाच्या राती
उधळून द्यावे संचित सारे आजवरी जे जपले
साथ राहू दे जन्मोजन्मी असेच नाते अपुले

पण कसे कळावे कुणी सांगावे आज-उद्या जे घडते
जरी हवे वाटते नवे विश्व ते पाऊल का अडखळते
वाहत-वाहत जाताना मन क्षितिजापाशी अडते
परि पुन्हापुन्हा मोहरते-
सारे कळत नकळतच घडते
>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>
गीत - अश्विनी शेंडे
संगीत - निलेश मोहरीर
स्वर - वैशाली माडे
  ( शीर्षक गीत, मालिका- कुलवधू, वाहिनी- झी मराठी )
   
मालिका- कुलवधू
माझी डोली चालली ग दूरदेशी नव्या गावा
तिथे सोबतीला येई माझ्या स्वप्‍नांचा रावा
तिथल्या चौकटीत शोधीन माझे नवेसे आभाळ
तिथले ऊन-पाऊस भरतील माझी ओंजळ

स्वप्‍न राही मागे आता व्यथा सतत उरात
नव्या उंबर्‍याची आस जागे तरिही मनात

एक नदी सारखी वाहते मी जणू
पाउलखुणा ठेवून मागे चालले मी कुलवधू

********************************************************************************
गीत - मधुकर आरकडे
संगीत - अशोक पत्की
स्वर - अरूण इंगळे
  ( शीर्षक गीत, मालिका- गोट्या, वाहिनी- झी मराठी )

                   गोट्या                    
बीज अंकुरे, अंकुरे, ओल्या मातीच्या कुशीत
कसे रुजावे बियाणे माळरानी खडकात?

बीजा हवी निगराणी, हवी मायेची पाखर
लख्ख प्रकाश निर्मळ त्यात कष्टाचा पाझर
हवी अंधारल्या राती चंद्रकिरणांची साथ

अंकुराचे होता रोप, होई रोपट्याचे झाड
मुळ्या रोवून रानात उभे राहील हे खोड
निळ्या आभाळाच्या खाली प्रकाशाचे गीत गात

नाही झाला महावृक्ष, जरी नसे कल्पतरू
फुला-फळांचा त्यावरी नाही आला रे बहरू
क्षणभरी विसावेल वाटसरू सावलीत
@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@

स्वर - देवकी पंडित
  ( शीर्षक गीत, मालिका- जगावेगळी, वाहिनी- झी मराठी )

मालिका- जगावेगळी

सुखाचा तिचा गोड संसार होता
कुणाची कशी दृष्ट त्या लागली
जळी सोडलेले दिवे दूर गेले
तरी सर्व नाती तिने सांधली
जगावेगळी ......

जरी संकटी पावलोपावली
उभारी तरी ना तिची भंगली
उन्हे सोसुनी दे जगा साऊली
जगावेगळी .....

&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&

No comments:

Post a Comment